आपल्या स्वप्नपूर्तीसाठी, आपुलकीचा हातभार...!

यवतमाळच्या मातीतून फुललेली, ३० वर्षांच्या अनुभवाची शिखर गाठलेली, आणि हजारो नागरिकांच्या विश्वासाची पायरी चढलेली ही पतसंस्था आर्थिक, सामाजिक क्षेत्रात अमुल्य योगदान देत आहे आणि आम्ही आमच्या “आपल्या स्वप्नपूर्तीसाठी, आपुलकीचा हातभार...!” ब्रीदवाक्यप्रमाणे हजारो ग्राहकाच्या स्वप्नासाठी हातभार लावत आहोत.

जयंत भिसे नागरी सहकारी पतसंस्था

यवतमाळच्या मातीतून फुललेली, ३० वर्षांच्या अनुभवाची शिखर गाठलेली, आणि हजारो नागरिकांच्या विश्वासाची पायरी चढलेली ही पतसंस्था आर्थिक, सामाजिक क्षेत्रात अमुल्य योगदान देत आहे आणि आम्ही आमच्या “आपल्या स्वप्नपूर्तीसाठी, आपुलकीचा हातभार...!” ब्रीदवाक्यप्रमाणे हजारो ग्राहकाच्या स्वप्नासाठी हातभार लावत आहोत.

५३ कोटींचा व्यवसाय आणि ४ शाखा या आकड्यांमागे आहे एक अविरत प्रयत्न, एक समर्पित माननीय संचालक मंडळ आणि एक दृष्टिकोन. यवतमाळातील अग्रगण्य आर्थिक पतसंस्था म्हणून, आम्ही सदैव आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम दर्जाची बँकिंग सुविधा पुरवण्यासाठी वचनबद्ध आहोत. आमचे तत्पर व प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आणि कोअर बँकिंग सारख्या आधुनिक प्रणालीद्वारे आम्ही ग्राहकांच्या प्रत्येक गरजेला प्रतिसाद देतो.

आम्ही केवळ आर्थिक उन्नतीचे स्वप्न पूर्ण केले नाही, तर सामाजिक जबाबदारीचेही ध्येय साध्य केले. रक्तदान शिबिरांमधून जीवदान, स्वच्छता अभियानांमधून निरोगी समाज, वृक्षारोपणामधून हिरवेगार भविष्य आणि महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून घरातील प्रत्येक घटकाचा आर्थिक विकास हे आमचे ध्येय आहे आणि ते आम्ही पूर्ण करत आहोत.

या पुढेही ही पतसंस्था समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहील.

a man hugging a woman in front of other people
a man hugging a woman in front of other people
a person is holding a pencil in front of a laptop
a person is holding a pencil in front of a laptop

मिशन

ग्राहकहित, सुरक्षितता व पारदर्शकता, व्यवसाय वृद्धीचे सातत्य, स्वावलंबन, समृद्धी, शिक्षण, ध्यास सामाजिक बांधिलकीचा व समाज प्रबोधनाचा.

व्हिजन

शाखा विस्तार, ठेवी १०० कोटी, सभासद संख्या १०,०००, सातत्य लेखा परिक्षण ‘ब ’ वर्ग मिळवण्याचे, सेवेतून नफा, नफ्यातून सेवा.

खाते

चालू खाते हे दैनंदिन वापरासाठी खाते आहे. व्यक्ती, व्यवसाय आणि वित्तीय संस्था आवश्यक पेमेंट्स आणि पैसे काढण्यासाठी तरलता निधी उपलब्ध ठेवण्यासाठी वापरतात. दोन किंवा अधिक लोक एकत्र खाते चालू ठेवू शकतात खातेदार त्यांच्या नावावर सर्व प्रकारचे धनादेश आणि ड्राफ्ट त्यांच्या नावावर जमा करू शकतात.

आवश्यक कागदपत्र ; खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

1.पत्त्याचा पुरावा : (पासपोर्ट / आधार कार्ड / ड्रायव्हरचा परवाना / मतदार ओळखपत्र / पॅन कार्ड).

2. भागीदारी करार (भागीदारी फर्मच्या बाबतीत).

3. समावेशन प्रमाणपत्र, असोसिएशनचे मेमोरेंडॅम ऑफ असोसिएशन आणि लेख

4. बँक खाते उघडण्यासाठी धनादेश

5. फर्म / कंपनी / एचयूएफचा पत्ता पुरावा.

6. पासपोर्ट फोटो

laptop computer on glass-top table
laptop computer on glass-top table

चालू खाते

बचत खाते

सभासदांना दैनंदिन व्यवहारासाठी लागणारा पैसा बचत खात्यात सुरक्षित राहतो. खात्यास व्याज मिळते, जशी गरज असेल तसे पैसे भरता किंवा काढण्याची सुविधा बचत खात्यात असते. संस्थेत स्वतःचे नवीन खाते उघडून परिपूर्ण बँकिग व तत्पर सेवेचा अनुभव घ्यावा.

आवश्यक कागदपत्र : खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

1.पत्त्याचा पुरावा : (पासपोर्ट / आधार कार्ड / ड्रायव्हरचा परवाना / मतदार ओळखपत्र / विद्युत बिल ).

2. ओळखीचा पुरावा : (पासपोर्ट / आधार कार्ड / ड्रायव्हरचा परवाना / मतदार ओळखपत्र / पॅन कार्ड ).

3. पासपोर्ट फोटो

मुदत ठेव योजना (FD)

मुदत ठेव खाते स्थिरतेसाठी ओळखली जातात आणि सुरक्षित बचतीच्या मार्गांचा शोध घेणाऱ्या विचारशील गुंतवणूकदारांना आकर्षित करतात. पतसंस्था आणि वित्तीय संस्थांकडून ऑफर केल्या जाणाऱ्या मुदत ठेवी मध्ये एक ठराविक रक्कम निश्चित कालावधीसाठी जमा केली जाते, ज्यावर निश्चित व्याजदर दिला जातो. हा निश्चित व्याजदर गुंतवणुकीवर निश्चित परतावा मिळण्याचे आश्वासन देतो आणि बाजारातील चढउतारांपासून गुंतवणूकदारांचे संरक्षण करतो. मुदत ठेवी मध्ये कालावधी आणि व्याजदराच्या परतफेडीचे विविध पर्याय उपलब्ध असतात, जे विविध आर्थिक गरजा लक्षात घेऊन डिझाइन केलेले असतात. मुदत ठेवी मध्ये मुद्लाची सुरक्षितता आणि कमी जोखमीची खात्री असते, स्थिरता आणि विश्वासार्हता प्राधान्य देणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी मुदत ठेव अजूनही एक पसंतीचा पर्याय आहे.


कालावधी

60-90 दिवस

91-180 दिवस

181- ३६४ दिवस

12- महिन


टक्केवारी

4.00%

7.00%

8.00%

10%

१०५ महिन्यात दामदुप्पट योजना संस्थेमार्फत राबविली जात आहे.
आपल्या काही मुदत ठेव योजना खालीलप्रमाणे:

आवर्त ठेव खातं ही एक बचत पर्याय आहे जिथे व्यक्ती नियमितपणे निश्चित रक्कम (मासिक) या खात्यात जमा करतात. या ठेवी कालांतराने जमा होतात, त्यावर व्याज मिळतं आणि ठराविक कालावधीनंतर एकूण रक्कम परत मिळते. RD हे एक नियोजित आणि सुलभ मार्ग आहे बचत करण्यासाठी आणि व्याज कमविण्यासाठी, ज्यामुळे नियमित बचतीची सवय विकसित करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी हा एक लोकप्रिय पर्याय ठरतो..

आवर्तक ठेव योजना (RD)

पिग्मी/ दैनंदिन ठेव योजना

जयंत भिसे नागरी सहकारी पतसंस्था, यवतमाळ यांनी सुरू केलेली 'पिग्मी डिपॉझिट योजना' ही एक दैनिक ठेव योजना आहे, ज्यामध्ये ग्राहक दररोज कमी रक्कम जमा करू शकतो. ही रक्कम केवळ पन्नास रुपये देखील असू शकते. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे संस्थेचा एजंट दररोज थेट ग्राहकांच्या व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन पैसे गोळा करतो. पैसे दररोज जमा होतात. त्यामुळे ग्राहक व्यवसायातील पैसे व्यवसायात वापरू शकतो.

जयंत भिसे नागरी सहकारी पतसंस्था तुमचे स्वप्न पूर्ण करण्यास समर्पित आहे. या कर्जप्रकारात व्यक्तीच्या स्वतःच्या मालकीच्या मालमत्तेचे (स्वतःची जमीन, स्वतःचे घर इ.) बाजार भावाप्रमाणे मुल्यांकन करून त्यावर कर्ज दिले जाते. आपल्या स्थावर मालमत्तेवर तारण कर्ज घेण्यासाठी अथवा त्याबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.

तारण कर्ज

सुवर्ण संचय योजना

प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असते सोनं खरेदी करणे, हे स्वप्न जयंत भिसे नागरी सहकारी पतसंस्था आपल्या सुवर्ण संचय योजनेद्वारे पूर्ण करत आहे.

सुवर्ण तारण कर्ज

वैयक्तिक कर्ज

जयंत भिसे नगरी सहकारी पतसंस्थेत, सोने तारण कर्ज योजना सुलभ, वित्तीय पर्याय उपलब्ध करून देते, जिथे कर्जदारांना त्यांच्या सोन्याच्या मालमत्तेचा वापर विविध आर्थिक गरजांसाठी करता येतो व सोनेही सुरक्षित राहते. आकर्षक व्याजदरांसह, सोपी प्रक्रिया आणि कस्टमायझेबल अटींमुळे, कर्जदारांना त्यांच्या आर्थिक प्रवासात आत्मविश्वासाने वाटचाल करता येते, तसेच सोन्याचे दीर्घकालीन मूल्य अबाधित राखून आवश्यक आर्थिक गरज भागवता येते. विशेषत: १२ महिन्यांसाठी कर्ज देत आहे. अगदी कमी व्याजदरात आर्थिक सुरक्षेसह जयंत भिसे नगरी सहकारी पतसंस्थेत सुवर्ण तारण कर्जाचा लाभ आपण घेऊ शकता.

जयंत भिसे नागरी सहकारी पतसंस्था तुमचे स्वप्न पूर्ण करण्यास समर्पित आहे. या कर्जप्रकारात व्यक्तीच्या स्वतःच्या जवाबदारीवर कमीतकमी कागदपत्रे घेऊन त्यावर कर्ज दिले जाते. आपल्या वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी अथवा त्याबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.

कर्ज योजना